
राजेश खन्ना
ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना उर्फ काका यांची तब्येत खालावल्यामुळे शनिवारी त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय आहेत. खन्ना यांच्या पोटात संसर्ग झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येतील. डॉक्टर या चाचण्यांचे अहवाल तपासून उपचारांची पुढील दिशा निश्चित करतील.