सुरेश कलमाडी यांचे राजकारणात कमबॅक

सुरेश कलमाडी

‘मला कोणीही पुण्याचा विकास करण्यापासून रोखू शकत नाही. मी लोकसभेची निवडणूक याच विकासाचा मुद्दा घेऊन लढविणार आहे,’ असे कॉंग्रेसचे नोलंबित झालेले खासदार सुरेश कलमाडी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी अजून आपणच ‘सबसे बडा खिलाडी’ असल्याचा नारा दिला.

सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या भेटीसाठी महापालिकेत येणाऱ्या कलमाडींना रोखण्याचा प्रयत्न केला. ‘आयुक्तांना खासदार या नात्याने पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून भेटण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. निदर्शने करून विरोधकांनी आपला वेळ वाया घालवला,’ अशी कलमाडी यांनी टिप्पणी केली.

कॉंग्रेसमधून निलंबन आणि तुरुंगवास भोगल्यानंतर सुमारे वर्षभरानंतर कलमाडी राजकारणात परतले. कलमाडी यांनी महापालिका आयुक्त महेश पाठक आणि अन्य अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली व पुण्याच्या प्रश्नांवर चर्चा केली. बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. कलमाडी यांनी परिषदेत भूतकाळात झालेल्या गोष्टींबाबत स्पष्टीकरण दिले आणि भविष्यकाळातील मनसुबे व्यक्त केले.

मोठ्या प्रमाणात पुण्यासाठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्निर्माण योजनेंतर्गत निधी आणल्या. जेएनएनयूआरएमचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. आयुक्तांची भेट पुण्यात प्रकल्प आणण्याठीच घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.