Tag Archives: अध्यक्ष

बॅडमिंटन प्रशिक्षक वसंत गोरे यांना जीवनगौरव पुरस्कार

बॅडमिंटन प्रशिक्षक वसंत गोरे यांना जीवनगौरव पुरस्कार

ज्येष्ठ बॅडमिंटन प्रशिक्षक वसंत गोरे यांना हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने बॅडमिंटन क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे. वसंत गोरे यांच्या सेलो बॅडमिंटन लीग स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते गौरव केला जाईल. मानपत्र व रोख दहा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

वसंत गोरे गेल्या चाळीस वर्षांपासून खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांचे वय ७६ असूनही त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करणे सोडलेले नाही. गोरे यांनी चार वेळा राष्ट्रीय विजेता ठरलेली मंजूष पावनगडकर-कन्वर, अदिती मुटाटकर, तृप्ती मुरगुंडे, हेमंत हर्डीकर, निशाद द्रविड आदी सर्व प्रमुख राष्ट्रीय खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. गोरे हे माजी क्रिकेटपटू असून, त्यांनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत सलामीवीर म्हणून केले आहे.