Tag Archives: अननस

अननसाची बर्फी

साहित्य :

  • मध्यम अननस किसून घ्या व लगदा मोजा
  • ३ वाट्या अननसाचा लगदा
  • ४ वाट्या साखर
  • १ वाटी सायीसकट दूध
  • १०० ग्रॅम खवा.

कृती :

अननसाची बर्फी

अननसाची बर्फी

अननसाचे मोठे तुकडे करा. नंतर अननस किसून घ्या.

गर मोजून घ्या व साखर तयार तयार करा.खवा परतून घ्यावा व बाजूला ठेवावा. अननस, साखर व दूध एकत्र करून गॅसवर ठेवा.

मिश्रण घट्ट होत आले की त्यात खवा घाला. जरा वेळ ढवळत रहावे नंतर खाली उतरवून घोटत रहावे.

चांगले घट्ट झाले की तूप लावलेल्या थाळीत ओतून थापा व वड्या पाडा.