Tag Archives: अप्पर जिल्हाधिकारी

जळीतकांडातील आरोपी पोपट शिंदेचा मृत्यू

पोपट शिंदे

पोपट शिंदे

अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे जळीतकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी पोपट शिंदे याचा आज (सोमवारी) जे.जे. हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात २५ जानेवारी रोजी झालेल्या जळीतकांडात शिंदे हा देखील भाजला होता. त्यानंतर त्याला जे.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला सोनावणे यांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला होता. त्याच वेळी त्यांना पेटवून देणारा आरोपी पोपट शिंदे हा देखील ७० टक्के भाजला होता. त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना जे.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेले सहा दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते पण उपचाराला त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. सहा दिवसांत त्याची तब्ब्येत खालावत गेली आणि आज त्याचा मृत्यू झाला.