Tag Archives: आमट्या

ओसामण

साहित्य :

 • १ वाटी तुरीच्या डाळीचे घट्ट वरण
 • ५-६ आमसुले
 • मीठ
 • गीळ
 • लवंग
 • दालचिनी
 • जिरे
 • कोथिंबीर
 • कढीलिंब
 • आल्याचा तुकडा
 • ३-४ हिरव्या मिरच्या

कृती :

ओसामण

ओसामण

वरणात पाणी घालून सारखे करावे. हिंग, जिरे घालून तुपाची फोडणी करावी.

फोडणीत मिरच्यांचे तुकडे व कढीलिंब घालावा.

त्यावर वरील वरणाचे पाणी घालावे. मीठ व गूळ घालावा.

लवंग, दालचिनी, जिरे व आले वाटून घालावे. थोडा काळा मसाला घालावा.

चांगले उकळले की उतरावे. वरुन थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.