Tag Archives: इसापनीती कथा

इसापनीती कथा

गरुड आणि घुबड

सर्व पक्ष्यांत सुंदर मुले कोणाची, हे एकदा प्रत्यक्ष पहावे म्हणून गरुडाने सर्व पक्ष्यांस आपापली पिल्ले घेऊन दरबारात हजर राहण्याचा हुकूम केला. त्याप्रमाणे सर्व पक्षी हजर झाले व प्रत्येकाने आपल्या पिलांच्या सौंदर्याची खूप स्तुती चालविली. शेवटी घुबड पुढे झाले व म्हणाले, ‘केवळ सौंदर्याकडेच पाहून जर मुलांची निवड करावयाची असेल तर माझ्या मुलांसारखी सुंदर मुले त्रिभुवनात सापडणार नाहीत !’ हे भाषण ऐकून सगळ्या पक्ष्यांत एकच हशा पिकला व त्यांनी त्या घुबडास तेथून हाकून लाविले.