Tag Archives: ऐतिहासिक

हे प्रवासवर्णन सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक

राज ठाकरे

राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली आहे की, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जगभरात ठिकठिकाणी परंपरा, ऐतिहासिक संचित यांचा प्रभावी वापर केला जातो पण, पूर्वजांनी महाराष्ट्रात दिलेल्या गोष्टींचा खुबीने कमी वापर करण्यात येत आहे.

मंत्री कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष सुहास मंत्री यांनी ‘दोन ध्रुवांवर दोन पावलं’ हे पुस्तक लिहीले आहे व या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी राज ठाकरे बोलत होते. मी आतापर्यंत जेवढी सर्वोत्तम प्रवासवर्णने वाचली आहेत, त्यांमध्ये या पुस्तकाचाही समावेशही होऊ शकतो, असे ते म्हणाले. राज ठाकरे यांनी वर्णन केले की, मंत्री यांनी उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावरील प्रदेशाचे तपशील आणि वैशिष्ट्यांसह ओघवते प्रवासवर्णन करुन हा प्रदेश सचित्र वाचकांसमोर उभी करण्याची किमया केली आहे.’ सुहास मंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले.