Tag Archives: ऑफिस

पूर्वी मंदिराच्या गाभार्‍यात

पूर्वी मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन
देवाचं मनोभावे दर्शन घेणार तो
आता फक्त मंदिराच्या पायर्‍यांवर बसून असतो
सुन्न होऊन
येणार्‍या जाणार्‍या भक्ताकडे पाहत
त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडत नाही आता
कुणासाठीही आपुलकीची शुभ्र धार
दिसतही नाही त्याच्या चेहर्‍यावर
आसमंतात झुलणारं चिअतन्य
किंवा हसतही नाही तो स्वतःच्या आयुष्यावर
कुठल्याही वेड्या उपहासानं
बांधलेल्या घरात राहमन सुद्धा
मी पाहतो त्याच्या चेहऱ्यावर
पडलेल्या घराची भगनता ओथंबून आलेली
एका जागी बसून सुद्धा नेहमीच मी पाहतो त्याला
कुठे तरी दूर दूर … एकटं…. एकाकी भटकतांना
तो असतो इथल्या
युवकांच्या बरबाद जिंदगीचा प्रतिनिधी
आयुष्यावर कसा जंग चढतो
ह्याच्या उदाहरणाचा तो असतो
एक सार्वेत्कृष्ट नमुना
लाचखाऊ लोकांच्या खेळाचं साधन असतो तो
सखीचं उघडं अंग झाकण्यास
असमर्थ असलेला साजन असतो तो…
तो पहतो कधी
एम्पलॉयमेन्ट ऑफिसला चकरा घालून घालून
झिजलेल्या स्वतःच्या स्लीपरच्या तळव्यंकडे
कधी हात ही फिरवितो स्वतःच्या
वाढलेल्या खुरट्या दाढीवरून
तसा त्याचा राग ही नसतो
कुणावर अन भारही नसतो
कुणाच्या खांद्यावर
… फक्त साप मेल्यावर वळवळत रहावी
काही वेळ शेपटी
तसाचा तो वळवळत असतो
आत्तशा चुपचापणे
आयुष्याच्या मातीत !