Tag Archives: ऑफिस

मुत्सुद्दी युवती

‘तू माझ्याशी लग्न करशील का ?’ असं विचारणाऱ्या एका तरुणाला त्य तरुणीनं विचारलं, ‘पण लग्न झाल्यावर तुम्ही ऑफ़िसमधून कुठे क्रिकेट, बॅडमिंटन वगैरे खेळ खेळायला न जाता परस्पर घरी याल का ?’

तरूण – अर्थात. तुझ्यासाठी सर्व खेळांचा त्याग करण्याची माझी तयारी आहे.

तरुणी – माझ्यासाठी सर्व मित्रांना सोडण्याची तयारी आहे ?३

तरुण – हे काय विचारणं झालं ? तुझ्यासाठी सर्व मित्रांची मैत्रीही सोडण्याची माझी तयारी आहे.’

तरूणी – आपणां दोघांना सुखात रहाता यावं, आपल्यामागे अन्य कुणाची कटकट असू नये म्हणून लग्न होताच आई-वडिलांन सोडण्याची तुमची तयारी आहे.?

तरुण – अगदी आनंदान. तुझ्यासाठी मी माझ्या आई-वडिलांनाही सोडून देईन. पण काय ग ? तुझी काय सोडण्याची तयारी आहे?

तरुणी – केवळ एका बायकोसाठी आरोग्य कायम राखणारे खेळ, वेळप्रसंगी उपयोगी पडणारे मित्र आणि लालन पालन करुन लहानाचे मोठे करणारे आई-वडिल यांना सोडायला तयार होणाऱ्या तुझ्यासारख्या लाचार तरुणाशी लग्न करण्याचा विचार मी आत्ताच सोडून दिलेला आहे.