Tag Archives: कविता

कविता

सोपानदेव चौधरी

सोपानदेव चौधरी हे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र होते.

स्वतंत्र भारती अता, तुझेच रुप पाहू दे..

जुने पणास त्याजिता, वसुंधरा नवी कळा
मनामनात आगळ्या नवीनता समावुदे !

दिवाकरा, मिषे तुझीच दिव्य दर्शने किती
कणाकणातली श्रुती जनाजनात ते नेऊ दे !

नभी दयार्द्रता तुझी. धरेत नित्य पाझरे
परात्परा असाच रे, झरा अखंड वाहू दे !