Tag Archives: कारकून

कारकून आणि कारभारी

एका कारकूनाचा एक बालपणाचा मित्र होता, त्यास एका संस्थानाच्या कारभाऱ्याची जागा मिळाली. ही गोष्ट त्या कारकुनास समजताच तो त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याजकडे गेला आणि म्हणाला, ‘मित्रा, तुला ही मोठया हुद्दयाची जागा मिळाली, याबद्दल मला फार आनंद वाटतो.’ यावर तो कारभारी म्हणाला, ‘अरे, तू कोण आहेस हे आधी मला कळू दे. तुझे नाव काय ? कारकून उत्तर करितो, ‘तुम्हांला हा जो एवढा मोठा अधिकार मिळाला आहे, त्याबद्दल दुःख प्रदर्शित करण्यासाठीं मी आलो आहे. तुमच्या या स्थितीबद्दल मला फार वाईट वाटते. कारण जी स्थिती प्राप्त झाली असता मनुष्यास इतका उन्माद येतो कीं, त्यास पाल्या जुन्या मित्राचीही ओळख पटत नाही, त्या स्थितीबद्दल त्या मनुष्याची कीव कोणास बरे येणार नाही ?’

तात्पर्य:- अधिकर आणि सत्ता यांच्या प्राप्तीमुळे ज्यांच्या स्वभावांत अंतर पडत नाही, असे लोक विरळा.