Tag Archives: काळे उडीद

वडे

साहित्य :

  • १ वाटी आखे काळे उडीद
  • १ वाटी हरभर्‍याची डाळ
  • २ वाट्या जाडे तांदूळ
  • तिखट
  • मीठ
  • हिंग
  • हळद
  • तेलाचे मोहन
  • थोडा काळा मसाला
  • पांढरे तीळ

कृती :

वडे

वडे

जाडे तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे.

हरभर्‍याची डाळ व काळे उडीद जरा भाजून घ्यावे. नंतर सर्व एकत्र करून त्याचा भरडा काढून आणावा.

आपल्याला ज्या प्रमाणात वडे करायचे असतील तसा भरडा घ्यावा.

त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, मसाला, तीळ व तेलाचे मोहन घालून पीठ भिजवावे.बेताच्या आकाराचे वडे करून मध्यभागी बोटाने भोक पाडा व बेताच्या विस्तवावर खमंग वडे तळा.