Tag Archives: कावळ्याचा संदेश

कावळ्याचा संदेश

कावळेदादाला लगली तहान
फिरता फिरता हरपले भान
शोधू लागला इकडे तिकडे पाणी
आटून गेली गळ्यातली गाणी
शोधून थकला पाणी काही दिसेना
व्याकूळ झाला काय करावे कळेना
झेप घेऊन गेला उंच झाडावर
माठ दिसे टेकडीवरती दूरवर
उंचावरून घेतली झेप आनंदाने
माठावरती बसून पाहू लागला आशेने
थोडेच होते पाणी तळाला
प्रयत्न करूनही येत नव्हते चोचिला
युक्ती केली मग कावळ्यान
दगड टाकले छोटे छोटे चोचिने
पाणी आले वर वर
पिऊन उडाला भर भर
सांगू लागे दुसऱ्या कावळ्याला
पाण्याची टंचाई भासे आपल्याला
अशी वेळ आता पुढे कधी येऊ नये
पुना कोणी अस व्याकूळ होऊ नये
यासाठी पाणी आडवू पाणी जिरवू
हाच संदेश माणसांना पाठवू
मग होतील माणसे गोळा
पाण्यासाठी भरेल शाळा
उपाय सारे करता येतील
पाण्याने तळे भरता येतील
पाण्याची मग भासणार नाही टंचाई
पाणीच पाणी सारीकडे भरुन राही