Tag Archives: कुरडई

साबुदाणा कुरडई

साहित्य :

  • साबुदाणा एक वाटी
  • चवीपुरते मीठ
  • दोन वाटी पाणी

कृती :

साबुदाणा पाच तास भिजून ठेवा. मग एका मोठ्या पातेल्यात घाला. मीठ टाका, पाणी उकळा. उकळते पाणी साबुदाण्यावर ओता. मिश्रण चमच्याने ढवळून सारखे करून रात्रभर झाकून ठेवा. चका गाळतो तसे सकाळी हे मिश्रण चाळणीतून गाळून घ्या. शेव करतो तो साचा सोऱ्यात घाला. त्यात साबुदाण्याचे मिश्रण घालून उन्हात प्लॅस्टिकच्य कागदावर कुरडई करतो त्या प्रमाणे गोलाकार कुरडई करा. उन्हात दोन/तीन दिवस चांगल्या वाळवा. स्वच्छ कोरड्या डब्यात भरून ठेवा जरुरीप्रमाणे तळून खा.