Tag Archives: कुर्मा

बटाटे डबलबीन्सचा कुर्मा

साहित्य :

 • १ वाटी उकडलेल्या बटाट्याच्या फोडी
 • २ वाट्या डबलबीन्सच्या बिया
 • पाव चमचा हळद
 • ४ हिरव्या मिरच्या
 • १ इंच आले
 • अर्धी वाटी कोथिंबीर
 • १ चमचा धन्याजिरयाची पूड
 • १ मोठा कांदा
 • ८-१० लसूण पाकळ्या
 • २ लवंगा
 • १ तमालपत्र
 • अर्धा इंच दालचिनी
 • १ वाटी गच्च भरून ओले खोबरे
 • २ चमचे खसखस
 • अर्धा वाटी दही
 • चवीनुसार मीठ
 • ३ चमचे तेल

कृती :

बटाटे डबलबीन्सचा कुर्मा

बटाटे डबलबीन्सचा कुर्मा

अर्धा चमचा तेलावर मिरच्या परताव्या व आले-कोथिंबीर वाटाव्या. डबलबीन्स पाण्यात शिजत ठेवावे.

पाण्यात पाव चमचा हळद घालावी. अर्धवट शिजल्यानंतर मीठ वाटलेला हिरवा मसाला त्यात घालावा व मंद आंचेवर भाजी शिजवावी.

नारळ व खसखस बारीक वाटावी. कांदे व लसूण बारीक चिरावी. जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापले की तमालपत्र,दालचिनी,लवंगा घालून त्यावर कांदा व लसूण घालून परतावी.

कांदा बदामी रंगावर आला की डबलबीन्स व बटाट्याच्या फोडी घालाव्या.

दोन वाट्या किंवा लागेल त्या प्रमाणात गरम पाणी घालावे. वाटलेला नारळ घालावा व पाच-सात मिनिटे मंद उकळू द्यावे. खाली उतरवून दही घुसळून त्यात घालावे व कुर्मा वाढावा.

डबलबीन्स‍ऐवजी गाजरे,फरसबी,बटाटे,कांदे,तोंडली,कोहळा इत्यादी मिश्र भाज्यांचे तुकडे वापरून असा कुर्मा करावा. पराठा कुर्मा हा दक्षिणेत आवडता मेनू असतो.