Tag Archives: कुल्चा

पनीर कुल्चा

साहित्य:

 • २ वाटी मैदा
 • २ मोठे चमचे दही
 • १/४ लहान चमचा बेकींग पावडर
 • १ लहान चमचा मीठ
 • १ लहान चमचा साखर
 • १/२ लहान चमचा इस्ट
 • १ मोठा चमचा तूप

भरण्यासाठी:

 • ३ बटाटे
 • १०० ग्रॅम पनीर
 • २ हिरवी मिरची
 • थोडीशी कोथींबीर
 • १ लहान चमचा लिंबू पिळून त्याचा रस
 • १/२ लहान चमचा मीठ
 • १ लहान चमचा साखर
 • तळण्याकरता तेल

कृती:

पनीर कुल्चा

पनीर कुल्चा

अर्धी वाटी थोड्याश्या गरम पाण्यात इस्ट भिजवा याच्यात मीठ व साखर टाकून व मिनीटे झाकुन ठेवा. नंतर मैदा गाळून त्याच्यात दही, बेकींग पावडर, तूप व पाण्यात टाकलेले इस्ट टाकून पीठ मळा, झाकुन ३ तास ठेवा. मैदाचे लहान-लहान पेढे करा. लाटून मधोमध पनीरचे मिश्रण भरा. बाजूने लावून  मिश्रण झाका व लाटा. कढईत तेल गरम करून लाटलेला कुल्चा टाका. दोन्ही बाजूने लालसर तळून गरमा-गरम वाढा.