Tag Archives: कॅरमल

कॅरमल केक

साहित्य :

 • दीड वाटी मैदा
 • १ वाटी साखर
 • अर्धी वाटी लोणी
 • २ चमचे बेकिंग पावडर
 • २ अंडी
 • अर्धी वाटी बारीक चिरलेली संत्र्याची पाकवलेली साल
 • ४-५ अक्रोड
 • अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स
 • १ चिमूट मीठ
 • कॅरमल सीरपसाठी अर्धी वाटी साखर
 • एकतृतीयांश वाटी पाणी.

कृती :कॅरमल सीरप :

एका पसरट पातेल्यात अर्धा वाटी साखर घालून पातले मंद आंचेवर ठेवावे. साखर विरघळली की त्यात पाणी घालून ढवळावे. पाक झाला की बाजूला ठेवून गार होऊ द्यावा.

मैद्यात बेकिंग पावडर व मीठ घालून चाळावे. अक्रोड सोलून त्याचे बारीक तुकडे व पाकवलेली साल चाळलेल्या मैद्यात घोळून मिसळावी. सर्व तुकड्यांना पीठ लागले पाहिजे.लोणी व साखर एकत्र मिसळून खूप फेसावी. मिश्रण मऊ व हलके व्हायला हवे. त्यात अंडी चांगली घुसळून मिसळावी. मिश्रण पुन्हा घुसळावे. शेवटी चाळलेले पीठ थोडे थोडे घालावे व चमचा चमचा कॅरमल सीरप व थोडे पीठ असे घालत मिसळत राहावे. व्हॅनिला घालावा. मध्यम आंचेवर सुमारे अर्धा तास केक भाजावी.