Tag Archives: केंद्र सरकार

शिवाजी, आंबेडकर, इंदिराजी आणि नेहरुजी येणार नोटांवर

शिवाजी, आंबेडकर, इंदिराजी आणि नेहरुजी येणार नोटांवर

भारताच्या चलनी नोटात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशिवाय इतरही थोर व्यक्तींना त्या नोटांवर स्थानपन्न करावे, अशी शिफारस समाजजीवनातील विविध क्षेत्रातील्या लोकांनी केली होती. रिझर्व्ह बॅंकेने व केंद्र सरकारने या प्रस्तावाला होकारात्मकता दर्शिविली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्याही मुद्रा आपल्याला नोटांवर दिसण्याची शक्यता आहे.

अहिंसेने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधींचे जनतेच्या हृदयांत अद्वितीय स्थान आहे. याचा पुरावा म्हणजे महात्मा गांधी यांचे देशातील हजारो लहान-मोठ्या शहारांतील रस्ते, चौक, शाळा, कॉलेज, विद्यापीठ यांना त्यांचे दिलेले नाव. मात्र, चलनी नोटांवरील त्यांची मक्तेदारी दिसून येते. ते स्वतःच इतके साधेपणाने राहिले की आपले छायाचित्र चलनी नोटांवर छापले जाण्याची कल्पना त्यांना कितपत आवडली असती, हा ही प्रश्न मनांत येतो. १९८७ साली सर्वप्रथम ५०० रुपयांच्याच नोटांवर त्यांचे छायाचित्र छापले जायचे पण १९९६ साला पासून प्रत्येक चलनी नोटावर त्यांचे छायाचित्र छापले जाऊ लागले आणि हे आजपर्यंतही चालू ठेवण्यात आले आहे. याबाबतीत त्यांची मक्तेदारी अबाधित असल्याचा हा पुरावा आहे. महात्मा गांधींच्या आधी चलनी नोटांवर कुणाचेही छायाचित्र नव्हते तेव्हा अशोक स्तंभ छापला जायचा.

दिलीप राजगोर यांचे म्हणणे आहे की, ह्या देशाने अनेक थोर व्यक्तींना जन्म दिले आहे मग त्यांनाही या नोटांवर स्थान देण्याचा विचार का केला जात नाही? महात्मा गांधी यांचे छायाचित्र काही आफ्रिकन देशांच्या चलनी नोटांवर आहे, काहींच्या नोटांवर ताजमहाल आहे तर गौतम बुद्ध यांचे स्थान नेपाळच्या काही नाण्यांवरही आहे. रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांचे यावर म्हणणे आहे की, चलनी नोटांवर कोणत्या व्यक्तीचे छायाचित्र छापायचे हे त्या देशातील लोकांच्या भावनेवर अवलंबून आहे. याला भारतही अपवाद नाही.