Tag Archives: केळीची पानगी

केळीची पानगी

साहित्य :

  • दोन वाट्या शिंगाड्या पीठ
  • कच्चे केळे एक
  • चवीनुसार तिखट
  • मीठ
  • थोडासा ओल्या नारळाचा कीस
  • जरूरीपुरते जिरे
  • तूप

कृती :

केळे किसून घ्या. परातीत पीठ, मीठ, तिखट, नारळ कीस, जिरे, केळे कीस घालून सैलसर पीठ भिजवून घ्यावे. ज्या प्रमाणे वरईची पानगी केली त्याप्रमाणेच पानगी भाजून गरम गरम खावी. त्यावर तूप सोडा किंवा उपवासाच्या लोणच्याबरोबर खा.