साहित्य :
- कच्ची केळी दोन/तीन
- एक वाटी शिंगाडा पीठ
- हिरव्या मिरच्या चार
- थोडे तिखट
- जिरे दोन चिमूट
- मीठ एक चिमूट
- सोडा
- तूप
कृती :
केळीची साल काढून त्याच्या पातळ/जाडसर चकत्या करून ठेवा. या चकत्यांना तिखट मीठ चोळा. जिरे मिरच्याचे वाटण करा. हे वाटण शिंगाडा पिठात घाला. मीठ, सोडा पिठात टाका. हे मिश्रण चांगले कालवा. थोडे पाणी घालून भज्याच्या पिठाप्रमाणे मिश्रण (पीठ) तयार करा. कढईत तूप गरम करा. केळीच्या चकत्या पिठात बुडवून भज्याप्रमाणे तळून काढा. गरम गरम असताना खा. चांगली कुरकुरीत होतात.