Tag Archives: केशर सरबत

केशर सरबत

साहित्य :

  • १ किलो साखर
  • ४०० मिली.पाणी
  • अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड
  • १ ग्रॅम केशर
  • १० ग्रॅम वेलची

कृती :

प्रथम केशर गरम करून पावडर करावी. त्यानंतर १ किलो साखरेत ४०० मिली. पाणी घालून त्यात अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड करावे. नंतर ते गॅसवर ठेवून ढवळत राहावे. एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा. नंतर त्यात केशराची पावडर व वेलची टाकावी. हे सरबत दुधातून देण्याची प्रथा आहे. पाव भाग लिक्विड आणि पाऊण भाग दूध व बर्फाचा खडा टाकावा.