Tag Archives: कॉर्नफ्लेक्स

कॉर्नफ्लेक्सचा चिवडा

साहित्य :

 • २५० ग्रॅम कॉर्नफ्लेक्सचे पाकीट
 • दीड वाटी भाजून सोललेले शेंगदाणे
 • १ वाटी डाळे
 • १ वाटी खोबऱ्याचे काप
 • थोडेसे काजू व बेदाणा
 • ८-१० हिरव्या मिरच्यांचे तुकडे
 • १ चमचा गरम मसाला
 • मीठ, साखर
 • हिंग
 • मोहरी
 • हळद
 • तेल.

कृती :

तेलाची हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करावी. त्यात मिरच्याचे तुकडे घाला.खोबऱ्याचे काप घाला. बदामी रंगावर आले की दाणे व डाळे घाला. चांगले ढवळून मीठ, साखर व गरम मसाला घालावा. काजू व बेदाणे घाला. नंतर त्यात कॉर्नफ्लेक्स घालून ढवळा. कॉर्नफ्लेक्स तळावे लागत नाहीत.