Tag Archives: कॉलीफ्लॉवर

कॉलीफ्लॉवरची भाजी

साहित्य :

 • ५०० ग्रॅम कॉलीफ्लॉवरचे तुरे
 • ३ मध्यम टोमॅटो
 • २ मध्यम कांदे
 • ३ हिरव्या मिरच्या
 • १ इंच आले ( किसलेले)
 • ४ चमचे तेल
 • अर्धा चमचा जिरे
 • अर्धा चमचा हळद
 • पाव हळद
 • पाव चमचा लाल तिखट
 • अर्धा चमचा गरम मसाला
 • १ चमचा मीठ (किंवा जरा जास्त)
 • १ चमचा धनेजिरेपूड

कृती :

कॉलीफ्लॉवरचे नीट साफ केलेले तुरे (फुले) पंधरा मिनिटे पाण्यात ठेवावे. त्यात दोन चिमट्या हळद घालावी. नंतर भाजी पुन्हा धुवून चाळणीवर निथळत ठेवावी. मिरच्या कांदे व टोमॅटो बारीक चिरावे.

एका रुंद पातेल्यात तेल तापत ठेवावे. त्यात जिरे व कांदा घालावा. त्यात मिरच्या व आले घालून तीनचार मिनिटे परतावा. त्यावर फ्लॉवर घालावा व टोमॅटो घालावे. झाकणीवर पाणी ठेवून मंद आंचेवर भाजी शिजत ठेवावी. अधूनमधून ढवळावे. अर्धवट शिजली की हळद, तिखट, धनेजिरेपूड व मीठ घालून ढवळावे. शिजली की वरून गरम मसाला शिवरावा. दोन मिनिटे चुलीवर ठेवून हलक्या हाताने भाजी परतावी व उतरवावी.