Tag Archives: खरबूजाची कोशिंबीर

खरबूजाची कोशिंबीर

साहित्य :

  • १ मोठे खरबूज
  • दीड वाटी दही
  • चिमूटभर मीठ
  • चवीपुरती साखर

कृती :

खरबूज साल व बिया काढून बारीक चिरून घ्यावे. त्यात दही, मीठ व चवीपुरती साखर घालून एकत्र करावे. फळांच्या कोशिंबीरीतला हा प्रकार उत्तम मानला गेला आहे. खरबूजाच्या कोशिंबीरीला फोडणी देऊ नये.