Tag Archives: खरबूज बिया

नानकटाई

साहित्यः

  • १ कप मैदा
  • १ कप वाटलेली साखर
  • पाव कप रवा
  • पाव कप बेसन
  • अर्धा कप तूप
  • ४-५ वाटलेली विलायची
  • खरबूज बिया

कृतीः

सर्व पहिले तूपास वितळून घ्यावे एका परातील वितळलेले तूप घेऊन खुप फेटावे. जर उन्हाळ्यात बनवायचे असेल तर पराती खाली एक बर्फ ट्रे लावून फेटावे. जेव्हा तूप थोडे सफेद होऊ लागले तेव्हा वाटलेली साखर मिळवून आणखिन चांगल्या पद्धतीने फेटावे. आता बेसन, मैदा व रवा टाकुन हलके व ढिले मिश्रण तयार करावे. आता मिश्रणाच्या गोल गोळ्या बनवाव्या. आवडल्यास चौकोनी आकारात बनवावी. आत ट्रे मध्ये थोडेसे तूप लावून थोड्या थोड्या अंतरावर गोळ्या ठेवाव्या. वाटलेली विलायची व खरबुजे बी सर्व गोळ्यांवर चिकटवावी. चाकूने प्रत्येक लाई वर दोन किंवा तीन निशान लावावे. आता ओवनमध्ये १८० डिग्री वर ३०-३५ मिनीट पर्यंत बेक करावे.