Tag Archives: खस

खस सरबत

साहित्य :

  • १ किलो साखर
  • ४०० मिली.पाणी
  • अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड
  • पाव चमचा अ‍ॅपल ग्रीन कलर
  • १ चमचा खस इसेंस

कृती :

प्रथम १ किलो साखरेत ४०० मिली. पाणी घालून त्यात अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड घालून एकत्र ढवळावे. गॅसवर ठेवून १ उकळी येईपर्यंत ढवळत राहावे. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. लिक्विड गार झाल्यानंतर त्यात रंग इसेंस टाकावा. सरबत देताना पाव भाग लिक्विड, पाऊण भाग पाणी घालावे. थंडगार खस सरबत उन्हाळ्यात पिण्यास खूपच छान वाटते.