साहित्य:
- ५०० ग्रॅम पांढरे चणे
- १५० ग्रॅम टोमॅटो
- २०० ग्रॅम कांदा
- ४-५ कळी लसूण
- १ तुकडा आले
- २ हिरवी मिरची
- १/२ लहान चमचा लाल तिखट
- १ लहान चमचा धणे पावडर
- २ लहान चमचे चना मसाला पावडर
- मीठ चवीप्रमाणे
- ३ चमचे तेल
- १ लहान चमचा आवळ्याची पावडर
- १/२ लहान चमचा खाण्याचा सोडा
कृती:

चणा मसाला
चणे ८ ते १० तास पाण्यात भिजवा. कुकरमध्ये १/२ चमचा खाण्याचा सोडा टाकून उकडून घ्या.
कांदा व टोमॅटो मिक्समधून काढा. आले, लसूण व हिरवी मिरची मिक्सरमधून काढा.
एका कढईत तेल गरम करून कांदा-टॉमेटोची पेस्ट परता. २ मिनीटांनी आल्याची पेस्ट टाका. व्यवस्थित परता व त्याच्यात लाल तिखट, धणे पावडर व मसाला टाकून परता.
आता उकडलेले चणे, मीठ व आवळ्याचे पावडर टाका व एकत्र करा व २ मिनीटे शिजवून गॅस बंद करा.