Tag Archives: खीर

वरईची गोड खीर

साहित्य :

  • वरई अर्धी वाटी
  • दोन मोठे पेले दूध
  • साखर
  • साजूक तूप
  • वेलची पूड
  • आवडीनुसार सुका मेवा

कृती :

वरई आधीच निवडून धुऊन सावलीत वाळवून घ्या. पातेल्यात तूप गरम करा. त्यात वरई लालसर भाजून घ्या. दुधात चवीनुसार साखर टाकून मंदाग्नीवर उकळत ठेवा. दूध ढवळून घ्या. दुधाला उकळी आली की आच मंद आचेवरच शिजत ठेवा. गरज पडली तर पुन्हा थोडे दूध घाला. शिजत आल्यावर वेलची पूड घाला. ढवळा. सुका मेवा घाला. भांडे खाली उतरा. थोडावेळ झाकून ठेवा. मग खायला द्या.