Tag Archives: खोपोली

वरदविनायक श्रीगणेश महड

प्राचीन काळी कर्जत खोपोली नजिकच्या भागात दाट अरण्य होते. त्याला पुष्पकवन असे नाव होते. या पुष्पक-भद्रक तपोवनात गृत्समद नावाच्या एका भक्ताने श्रीगणेशाला प्रसन्न करुन घेण्यासठी कडक तपश्चर्या केली. त्याने ‘ॐ गं गणपतेय नमः’ हा मंत्र रचून त्याचा जप केला. त्याची कठोर तपश्चर्या पाहून श्रीगणेश प्रसन्न झाले व त्याच्यासमोर प्रकट होऊन त्यांनी आपल्या या भक्ताला वर दिला- ‘मी येथेच या वनात राहून भक्तांच्या इच्छा पूर्ण करीन.’

आणि भक्ताला दिलेल्या वचनाप्रमाणे महड येथील तलावात विनायकश्रीगणेश गृत्समदला मूर्तीरुपाने मिळाला. अशा प्रकारे गणेशाने गृत्समदाला वर देऊन आपले वचन पूर्ण केले म्हणून ‘वरदविनायक’ स्वरुपात तो महड तीर्थक्षेत्रात स्थापन झाला.