Tag Archives: गंगाधर देशपांडे

टोरांटो संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यापर्यंत

टोरांटो

टोरांटो

टोरांटो येथे जे चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन होणार आहे, त्याची तयारी आता अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर मध्ये हे संमेलन होणार असून, बहुसंख्य साहित्यिकांची ‘व्हिसा’ची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. मराठी सारस्वतांच्या स्वागताला टोरांटोवासीयही सज्ज झाली आहेत.

हे विश्व संमेलन ऑगस्टच्या सुरुवातीलाच होणार होते पण काही अडचणींमुळे ते ऑगस्टच्या अखेरपर्यंत लांबणीवर पडले गेले. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या तयारीला गती आली आहे. हा तीन दिवसांचा सोहळा टोरांटोजवळील मिसिसॉगा या शहरातील लिव्हिंग आर्ट्स सेंटर येथे रंगणार आहे. स्थानिक संयोजक असलेल्या मराठी भाषिक मंडळाचे सल्लागार समिती सदस्य गंगाधर देशपांडे यांनी माहिती दिली की, कंद्राजवळच्या हॉटेलमध्येच येणाऱ्या सारस्वतांच्या पाहुणचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे संमेलन नामवंत कवी ना. धों. महानोर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यासाठी, संमेलनाध्यक्षांसह साहित्य महामंडळाच्या इतर पदाधिकाऱ्यांची ‘व्हिसा’ची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. ३० ऑगस्टला बहुतांश साहित्यिक टोरांटोला रवाना होणार आहेत.

या संमेलनाची सर्व माहिती साहित्यिकांसह सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी संयोजकांनी www.vmsstoronto.com हे संकेतस्थळही सुरु केले आहे.