Tag Archives: गव्हाची खीर

गव्हाची खीर

साहित्य :

  • पाव किलो गव्हाचा जाडसर रवा
  • पाव किलो गूळ
  • पाव लिटर दूध
  • पाव तुकडा जायफळ
  • २ चमचे खसखस
  • ४ वेलदोडे
  • २ चमचे बदाम पिस्त्याचे काप
  • अर्धी वाटी खवलेला नारळ

कॄती :

गव्हाचा रवा अर्धा लिटर पाणी घालून कुकरमध्ये ३ शिट्या होईपर्यंत शिजवावा. गार झाल्यावर त्यात गूळ, खोबरे, वेलची पूड, खसखस पूड, जायफळ पूड, घालून मंद आचेवर शिजवून घ्यावे. गूळ रव्यात मिसळेपर्यंत म्हणजे साधारण ५ ते ७ मिनिटे शिजवल्यानंतर हे मिश्रण खाली उतरवून त्यात दूध घालावे. डेकोरेशनसाठी वरून बदाम पिस्त्याचे काप पसरावेत.

ही खीर चवीस उत्तम व पौष्टीक आहे.