Tag Archives: गहु

गव्हाच्या रव्याचा उपमा

गव्हाच्या रव्याचा उपमा

गव्हाच्या रव्याचा उपमा

साहित्य :

  • पाव किलो गव्हाचा जाडसर रवा
  • १ वाटी चणा डाळ
  • ४ चमचे खोबरे
  • कोथिंबीर
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • मीठ
  • अर्धी वाटी तेल
  • चवीपुरती साखर
  • फोडणीचे साहित्य

कृती :

गव्हाचा रवा थोड्या पाण्यात कुकरमध्ये शिजवून घ्यावा. डाळ भिजवून ती जाडसर वाटून घ्यावा. मिरची डाळीबरोबरच मिक्सरमध्ये फिरवून घ्यावी. अर्धी वाटी तेलात हिंग, जिरे, हळद, मोहरी घालून फोडणी तयार करावी व त्यात वाटलेली डाळ परतून घ्यावी. नंतर त्या डाळीत शिजवलेला रवा, मीठ व चिमूटभर साखर घालून मंदाग्नीवर परतावे. १५ मिनिटानंतर उपमा तयार होईल. त्यावर कोथिंबीर पसरून खाण्यास द्यावे. ह्यामध्ये मटार, काजू वगैरे घालून स्वाद वाढवू शकता.