Tag Archives: गहू

दराबे लाडू

साहित्य :

  • ५०० ग्रॅम चांगल्यातले गहू
  • २५० ग्रॅम पिठीसाखर
  • १ वाटी घट्ट डालडा
  • २ टे. चमचा साजूक तूप
  • ५-६ वेलदोड्याची पूड
  • पाव जायफळाची पूड.

कृती :

गहू रात्री पाण्यात भिजत घाला. सकाली उपसून एका डक्यात सैल पुरचुंडी करून बांधा. दुस्ऱ्या दिवशी कपड्यावा पसरून वाळवा. नंतर त्याचा रवा काढा. त्या चाळला की खाली थोडे सपीटही पडेल.जाड बुडाच्या पातेल्यात त्या व सपीट वेगवेगळे भाजा. नंतर हे मिश्रण थाळीत ओता. भाजून घेतलेले मिश्रण गार झाल्यावर हाताने खूप फेसावे. नंतर त्यात साखर घालून लाडू वळावे.