Tag Archives: गुळाची पोळी

गुळाची पोळी

साहित्य :

  • अर्धा किलो गूळ
  • अर्धी वाटी तीळ
  • अर्धी वटी किसलेले सुके खोबरे
  • ७-८ वेलचीची पूड
  • १ डावभर खसखस
  • १ डावभर डाळीचे पीठ
  • अर्धा किलो कणीक
  • अर्धी वाटी तेल

कृती :

गूळ किसणीवर किसून घ्यावा. त्यात सुके खोबरे, तीळ, खसखस भाजून बारीक करून घालावी.डाळीचे पीठ तेलावर भाजून त्यात मिसळावे. वेलचीची पूड घालून त्या गुळाचे पुरीच्या गोळीएवढे गोळे करावेत.कणीक अर्धीवाटी तेल घालून नेहमीच्या कणकीप्रमाणे भिजवावी. त्याचे पुरीएवढे २ गोळे घेऊन त्या लाट्यात
गुळाची लाटी घालून सर्व बाजू नीट बंद करून पोळी लाटावी. मंद आचेवर भाजावी.

टिप : ही पोळी २-३ दिवस चांगली राहते.