Tag Archives: गोड भाकरी

गोड भाकरी

साहित्य :

  • दीड वाटी कणिक
  • अर्धी वाटी गूळ
  • पाव चमचा मीठ
  • २ चमचे साजूक तूप
  • अर्धी वाटी पाणी
  • तळण्यासाठी तूप

कृती :

गोड भाकरी

गोड भाकरी

गूळ पाण्यात विरघळला की पाणी गाळून घ्यावे. कणकेत तुपाचे मोहन, मीठ घालून गुळाच्या पाण्याने पीठ भिजवावे.

पीठ घट्ट असावे. लागल्यास थोडे पाणी किंवा कणिक यांचे प्रमाण वाढवावे. अर्धा तास झाकून ठेवावे. त्याच्या नेहमीसारख्या भाकर्‍या लाटून तव्यावर भाजाव्या.

दोन्ही बाजूंवर थोडे तूप सोडून चुरचुरीत परताव्या. एका ताटात पसरून गार होऊ द्याव्यात.

गंमत म्हणून एखादेवेळी त्यावर काजूचे काप भाकरी लाटतानाच पसरावेत म्हणजे लाटण्याने दाबले जातात. ही काजूची गोड भाकरी लोणी किंवा तूप व लोणचे, कोशिंबीर याबरोबर खावी