Tag Archives: गोळ्यांची आमटी

गोळ्यांची आमटी

साहित्य :

 • १ भांडे डाळीचे पीठ
 • २ चमचे तिखट
 • पाव चमचा हळद
 • अर्धा चमचा मीठ
 • पाव चमचा हिंग
 • १ पळी तेल (गोळ्यांसाठी)

आमटीचे साहित्य :

 • पाव वाटी किसलेले सुके खोबरे
 • अर्धा चमचा तिखट
 • अर्धा चमचा मीठ
 • ३ पळ्या तेल
 • गोडा मसाला
 • चिंच
 • गूळ
 • फोडणीचे साहित्य

कृती :

डाळीच्या पिठात वरील साहित्य घालून ते भिजवावे. त्याचे लहान सुपारीएवढे गोळे करावेत. ते तेलात थोडेसे तळून घ्यावेत. फोडणी करून ३ भांडी पाणी घालावे. त्यात सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून अर्धा चमचा जिरे वाटून घालावे. पाण्यात तिखट, मीठ, सुपारीएवढी चिंच, अर्ध्या लिंबाएवढा गूळ, अर्धा चमचा गोडा मसाला घालावा. त्याला उकळी आली की तळलेले गोळे त्यात सोडावेत. ते चांगले शिजले की आमटी उतरवावी.