Tag Archives: गोवत्सद्वादशी

औक्षण

मंगल कामनेचे प्रतीक आहे औक्षण. जीवनातील अनेक मंगल विधीत औक्षणाचे महत्व सांगितलेले आहे. संध्यावंदनाच्या वेळी

‘शुभ करोत कल्याणं आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुधि विनाशाय दीपज्याति नमोऽस्तुते ।’
असे आपण म्हणतो. कल्याण प्रदान करू शकणाऱ्या दीपज्यातीने औक्षण केले जाते. जन्माला आल्यानंतर बाराव्या दिवशी प्रथम औक्षण होते. नागपंचमी, रक्षाबंधन, भाऊबीज या वेळीही बहीण भावाला ओवाळते. गोवत्सद्वादशी, पोळा या दिवशी गाई-बैलांनाही ओवाळतात. द्सऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनानंतर औक्षणानेच स्वागत केले जाते. बऱ्याच दिवसांनंतर घरी परतणाऱ्या व्यक्तीलाही औक्षण केले जाते. भारतातील वीरपत्नी रणांगणावरून परत आलेल्या पतीला औक्षण करतेच पण तो रणागंणावर जात असतानाही आपल्या सर्व सदिच्छा त्याच्या पाठीशी राहोत, हा भाव औक्षणातूनच व्यक्त करते. घरातील अशा सुंदर प्रथांतूनच संस्कृती व्यक्त होते व टिकते.