Tag Archives: घारगे

घारगे

साहित्य :

  • १ मोठी वाटी तांबड्या भोपळ्याचा कीस
  • पाव मोठी वाटी बारीक चिरलेला गूळ
  • अर्धा चमचा मीठ
  • १ चमचा तेलाचे मोहन
  • तांदळाचे पीठ

कृती :

घारगे

घारगे

तांबडा भोपळा किसून घ्या.नंतर त्यात गूळ घालून दोन्ही एकत्र करून शिजवून घ्या.

नंतर खाली उतरवून त्यात मीठ, तेल व तांदळाचे पीठ घालून पीठ तयार करा.

जेवढे तांदळाचे पीठ सामावेल तेवढे घाला.

नंतर केळीच्या पानाला तेलाचा हात फिरवून लहान लहान वडे थापून तळावे.