Tag Archives: चंद्रपुर

साधनाताई आमटे यांचे निधन

साधनाताई आमटे
साधनाताई आमटे

केवळ कुष्ठरोगीच नव्हे नेत्रहीन, विकलांग आणि निराधाराच्या कल्याणासाठी गेली ६० वर्षे सेवेत असलेल्या जेष्ठ समाजसेवीका साधनाताई आमटे यांचे शनिवार दिनांक ९ सायंकाळी ४ वाजून ५६ मि. देहावसान झाले, त्या ८६ वर्षांच्या होत्या.

‘आनंदवन’ च्या माध्यमातून महान समाजसेवक स्व.बाबा आमटे यांच्या खांद्याला खांदा लावुन समाजसेवेचा इतिहास रचणार्‍या साधनाताई आनंदवनाच्या आधारवड होत्या.

गेल्या काही दिवसांपासुन त्यांनी अन्नत्याग केला होता, आणि १५-२० दिवसांपासुन बोलनेही बंद केले होते. माहिती नुसार २ दिवसांपासुन त्या कृत्रिमरित्या ऑक्सीजन वर होत्या आणि शनिवारी सायंकाळी त्यांनी आनंदवनात अखेरचा श्वास घेतला.

या वेळी त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र डॉ.विकास आमटे, विलास मनोहर, रेणुका मनोहर, कौस्तुभ, डॉ.भारती आमटे आदि उपस्थित होते.