Tag Archives: चक्का

श्रीखंडाच्या वड्या

साहित्य :

  • २ वाट्या चक्का
  • ३ वाट्या साखर
  • ३ वाट्या चाळलेली पिठीसाखर
  • तोडा केशरी रंग व केशर
  • १०-१२ वेलदोड्याची पूड
  • पाव जायफळाची पूड.

कृती :

पुरणयंत्रात दोन नंबरची जाळी लावून त्यातून चक्का गाळून घ्यावा. नंतर त्यात साखर घालून गॅसवर ठेवा. मध्य्म आंचेवर सतत हलवत रहावे. मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलदोड्याची पूड, जायफळाची पूड, केशर व रंग घाला. नंतर खाली उतरवून डावाने घोटा. थोडी थोडी पिठीसाखर घालत रहा. सगळा सारखा गोळा झाला की, तूप लावलेल्या ताटात थापा. जरा निवल्यावर वड्या कापा. थंड झाल्यावर डब्यात भराव्या. ह्या वड्या दोन महिनेपर्यंत टिकतात.