Tag Archives: चणाडाळ

सांभर मसाला

सांभर मसाला

सांभर मसाला

मात्रा :

 • ४५० ग्रॅम

साहित्य :

 • १२० ग्रॅम धणे
 • ८० ग्रॅम जीरे
 • ३० ग्रॅम काळी मिरी
 • ३० ग्रॅम सरसो
 • ३० ग्रॅम मेथी
 • २० ग्रॅम अख्खी लाल मिरची
 • ३० ग्रॅम हळद
 • १० ग्रॅम लसणाची पावडर
 • ६० ग्रॅम चण्याची डाळ
 • ६० ग्रॅम उडदाची डाळ
 • १० ग्रॅम हिंग
 • तळण्यासाठी तेल

कृती :

दोन्ही डाळी धुवून वाळवून घ्या. कढईत तेल टाकून डाळी सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्या. डाळी कागदावर टाकून जास्तीचे तेल काढून घ्या. वरील इतर सामग्री तेलात गरम करुन सर्व एकत्र कुटावे. एका स्वच्छ व कोरड्या डब्यात भरुन ठेवावा. सांभर करायच्या वेळीच हा मसाला ताजाच केला तरी चव अजून छान लागते.