Tag Archives: चणे

मुलगा आणि चणे

एक मनुष्य खापरात चणे भाजीत असता, ते चणे फड फड करून उडया मारू लागले. ते पाहून, जवळच एक लठ्ठ डोक्याचा मुलगा बसला होता तो म्हणाला, ‘हे चणे किती मुर्ख आहेत ! यांचे सगळे अंग भाजले जात असता ह्यांना गाणे सुचते आहे, तेव्हा यांच्या शहाणपणाची धन्य आहे, असे म्हटले पाहिजे’.

तात्पर्य:- अवेळी कोणतीही गोष्ट करणारा मनुष्य स्वतःस हास्यास्पद करून घेतो.