Tag Archives: चनाडाळ

चनाडाळीचे कोफ्ते करी

साहित्य :

 • २५० ग्रॅम चनाडाळ
 • २ इंच आले
 • ४-५ हिरव्या मिरच्या
 • मीठ
 • २ कांदे
 • ६-७ लसूण पाकळ्या
 • २ लवंगा
 • अर्धा चमचा जिरे
 • ३ वेलदोडे
 • तमालपत्र
 • १ वाटी दही
 • अर्धा चमचा तिखट
 • अर्धा चमचा धनेपूड
 • पाव चमचा हळद
 • अर्धा चमचा गरम मसाला
 • १ चमचा साखर
 • २ मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर
 • तेल

कृती :

डाळ दोन तास भिजत टाकावी. चाळणीत निथळावी. आले, मिरच्या व मीठ एकत्र भरडसर वाटावी. तेलाच्या हाताने या मिश्रणाचे लहान लाडू वळावेत व तेलात हे कोफ्ते तळून कागदावर निथळावेत.

कांदे बारीक चिरावेत. आले-मिरच्या-लसूण व कांदे एकत्र वाटावेत. एका जड बुडाच्या पातेल्यात कढईतल्या उरलेल्या तेलातले थोडे तेल (सुमारे ४ ते ६ चमचे) घालावे. तेल तापले की जिरे, लवंगा, तमालपत्र, वेलदोडे घालावे. बदामी रंगावर आले की त्यात वाटलेला मसाला घालावा व परतावे. धनेपूड, तिखट, हळद एकत्र करून घुसळलेल्या दह्यात घालावी. नीट मिसळून दही व साखर मसाल्यावर ओतावी. तीन वाट्या पाणी घालून रस मंद उकळू द्यावा. ३-४ मिनिटे उकळल्यानंतर कोफ्ते घालावेत व पाच मिनिटे उकळू द्यावे. आंच अगदी कमी ठेवावी. वरून गरम मसाला व कोथिंबीर घालावी. चमचाभर अमूल किंवा साधे लोणी गरम करीवर घालावे व वाढावी.