Tag Archives: चिकी

तिळाची झटपट चिकी

साहित्य :

  • १ वाटी पांढरे पॉलिशचे तीळ
  • १ वाटी साखर
  • ५-६ थेंब गुलाबाचा एसेन्स
  • अर्धा चमचा तूप

कृती :

कढईत तीळ घालून मंद आंचेवर पांच मिनिटे कोरडे भाजावेत. पोळपाट व लाटण्याला तुपाचा हात फिरवावा व त्यावर ताट पालथे घालून झाकून ठेवावे.

एका जड बुडाच्या पातेल्यात साखर घालून चुलीवर ठेवावे. आंच खुप कमी ठेवावी. साखर विरघळली की तीळ व एसेन्स त्यात घालून झटपट मिसळावे. लागलीच मिश्रण पोळपाटावर ओतून लाटाण्य़ाचे पातळ लाटावे. लगेच धारदार सुरीने वड्या कापाव्या. निवाल्यानंतर सावकाशीने वड्या सुट्ट्या कराव्यात. काळजीपूर्वक व पद्धतशीर केल्यास या वड्या चांगल्या होतात व पुरवठ्यास येतात.