Tag Archives: चित्रभूषण

सचिन आणि उमा यांना चित्रभूषण

सचिन पिळगावकर आणि उमा भेंडे

सचिन पिळगावकर आणि उमा भेंडे

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांना यंदाचा अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. पुण्याचे नावडकर पेंटर आणि अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना चित्रकर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. ११ ऑगस्टला गणेश क्रीडा केंद्र येथे एका कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात येईल.

ज्यांनी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे त्यांना दरवर्षी चित्रभूषण आणि चित्रकर्मी पुरस्कार देण्यात येतात. महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी मंगळवारी मुंबईत पुरस्काराची घोषणा केली. या कार्यक्रमात उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्यवाह सुभाष भुर्के, विजय पाटकर, अलका कुबल आठल्ये, प्रिया बेर्डे, संजीव नाईक आदी उपस्थित होते. १० ऑगस्टपासून भारतीय चित्रपटाच्या शताब्दीनिमित्त शंबर रुपयांमध्ये शंभर चित्रपटांचा महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. १० ते १२ ऑगस्ट या कालावधीत जुन्या बुकलेट आणि पोस्टरचे प्रदर्शन केले जाणार आहे.

‘ज्या कलाकारांना मराठी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे त्यांचा या कार्यक्रमात गौरव केला जाणार आहे. ज्या चित्रपटाने सर्वाधिक व्यावसायिक यश मिळवले आहे त्या चित्रपटाला आणि चित्रपटगृह मालकांनाही यंदापासून सन्मानित करण्यात येणार आहे,’ असे अध्यक्ष सुर्वे म्हणाले.