Tag Archives: चिन्ह

भारतीय रुपयाचे चिन्ह आता संगणकावर

भारतीय रुपयाचे चिन्ह
भारतीय रुपयाचे चिन्ह

अमेरीकन डॉलर आणि ब्रिटिश पाउंड प्रमाणे आता भारतीय रुपयाचे प्रतिक चिन्ह आता आपल्या संगणकावर उपलब्ध होवु शकणार आहे.

यासाठी आपणांस एक सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे लागणार आहे जे भारत सरकार मोफत उपलब्ध करुन देत आहे.

याशिवाय मायक्रोसॉफ्ट ने देखिल भारतीय रुपया च्या प्रतिक चिन्हासाठी एक सपोर्ट कार्यप्रणाली तयार केलेली आहे.

सॉफ्टवेअर

हे नविन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी डेवलपमेंट फॉर इंडियन लैंग्वेजेस (टीडीआईएल) डेटासेंटर ने प्रसारित केले आहे.

भारतीय रुपयाचे प्रतीक चिन्ह निवडले गेल्या नंतर तीन महीन्यांच्या आतच हे सॉफ्टवेअर यूनीकोड कॉन्सोर्टियम आणि आईएसओ ने मिळून तयार केले होते.

मात्र शुक्रवारी हे सॉफ्टवेअर प्रसारित केले गेले जेव्हा रुपयाच्या चिन्हास मान्यता मिळून एक वर्ष पुर्ण झाले.

गेल्या वर्षी जलै महिण्यात सरकारने या चिन्हास मंजुरी दिली होती. यापुर्वी रुपया साठी प्रतीक चिन्ह नव्हते.

वित्त मंत्रालयाने शुक्रवारी म्हंटले आहे, “रुपयाच्या प्रतीक चिन्हास अधिक लोकप्रिय बनविण्यासाठी याला यूनीकोड स्टॅन्डर्ड आणि नॅशनल स्टॅन्डर्ड च्या अनुरुप तयार करण्यात आले आहे.”

डाऊनलोड कसे करावे

पीटीआय च्या वृत्ता नुसार यासाठी आपणांस एक सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे लागणार आहे जे आपणांस http://tdil-dc.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

या नंतर जर आपणांस प्रतिक चिन्हाचा वापर करावयाचा झाला तर Alt Gr आणि या सोबत संख्या 4 ची कळ दाबावी लागेल.

दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट ने विंडॉज विस्टा, विंडोज सर्वर २००८, विंडॉज ७ आणि विंडोज २००८ आर२ यासाठी देखिल एक अपडेट प्रसारित केले आहे.