Tag Archives: चीकी

काजू कतली काजू वडी

साहित्य :

  • ४०० ग्रॅम काजूफ्रूट
  • ३०० ग्रॅम पिठीसाखर
  • ६० मिली पाणी
  • १ चमचा तूप

कृती :

काजूफ्रूट साफ करून उन्हात खडखडीत वाळवावी व त्याची यंत्रावर बारीक पूड करावी. पिठीसाखरेत पाणी घालून जाडसर पाक करावा. त्यात काजूपूड घालावी व सतत ढवळावे. आंच अगदी मंद ठेवावी. एकीकडे पोळपाट व लाटण्यावर तुपाचा हात फिरवून झाकून ठेवावे.

चुलीवरच्या मिश्रणाचा मऊसर गोळा झाला की खाली उतरवावे. गोळा पोळपाटावर ठेवून मिश्रण हलक्या हाताने लाटावे. पातळ वडी होईल इतपत अलगद पसरावे. कोमट झाल्यानंतर वड्या कापाव्यात.