Tag Archives: जयंत पाठक

आता शाळांना सुद्धा तारीख पे तारीख

अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी १५ जूनला शाळा सुरु करण्याचा सरकारी आदेश धुडकावून लावला आहे. अनेक शाळा सरकारी आदेशाची पर्वा न करता ८ किंवा ११ जूनलाच सुरु होणार आहेत.

राज्याच्या शैक्षणिक वेळापत्रकात सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षीपासून १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचे आदेश शाळांना दिले होते. मागच्या वर्षी वेळेत कळवले नाही, असे ओरडून शाळांनी हा निर्णय गुंडाळला होता. मात्र यावेळी ११ जूनपासूनच शाळा सुरु करण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

११ जूनपासून स्प्रिंगडेलच्या शहरातील सर्व सात शाळा सुरु होणार आहेत. स्प्रिंगडेलच्या आंबेगाव शाखेच्या मुख्याध्यापिका शीतल सपकाळ यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी १५ जून ऐवजी ११ जूनपासून शाळा सुरु करु, असे सांगितले. त्यांनी असेही सांगितले की, तासभरात निर्णय बदलत शाळेच्या व्यवस्थापनाशी बोलत शाळा १५ जूनपासून सुरु करण्याबाबत गुरुवारी सकाळपर्यंत फेरविचार होऊ शकतो.

नविन शैक्षणिक वर्ष सोमवार पासून सुरु होणार आहे व यासाठी ११ जून ही तारीख योग्य वाटत असल्याची भूमिका काही शाळांनी घेतली आहे. सेंट हेलेनाज शाळेने तर तारीख आणखी मागे घेऊन ८ जूनलाच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

१५ जून पासून सुरु होणारी कोथरुडमधील न्यू इंडिया स्कूल मधल्या काही इयत्तांचे वर्ग एका समारंभामुळे १३ जूनला भरणार आहेत. कोणत्याही वादात न पडता रोझरी स्कूलने १५ जूनपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. एका पालकाने माहिती दिली सरकारी आदेशानुसार शाळा १५ जूनला सुरु होणार आहे. नाहीतर आदीच्या वेळापत्रकानुसार शाळा ११ जूनलाच सुरु होणार होती.

सरकारी आदेशानुसार बहुतेक मराठी शाळा १५ जूनलाच सुरु होणार आहेत. जयंत पाठक यांनी सांगितले की, ‘एमआयटी’च्या श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाचे वर्ग १५ तारखेलाच भरतील. `१५ जूनलाच शाळा सुरु करण्याचा गेल्या वर्षीचाच आदेश असल्यामुळे यावर्षीही शाळा १५ तरखेलाच सुरु होणार आहे,’ असे अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला चाफेकर यांनी स्पष्ट केले.