Tag Archives: जागतिक विक्रम

सी.ओ.ई.पी कॉलेज – जागतिक विक्रमाची हॅट्रिक

सी.ओ.ई.पी कॉलेज - जागतिक विक्रमाची हॅट्रिक

सी.ओ.ई.पी कॉलेज – जागतिक विक्रमाची हॅट्रिक

रुबिक क्यूब्स हे जगप्रसिध्द कोडे एकाचवेळी अनेकजणांनी कमी वेळेत सोडवून सी.ई.ऒ.पी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा विश्वविक्रम केला. ४ फेब्रुवारी ला झालेल्या या विश्वविक्रमात ३२६७ लोकांनी सहभाग घेतला होता. यात कॉलेजच्या आजी माजी विद्यार्थ्यां पासून ते सामान्य नागिक मोठ्य़ा उत्साहाने सहभागी झाले होते. या सर्वांनी अवघ्या ३० मिनिटात रुबिक क्यूब सोडवून विश्वविक्रम नोंदवला. या विक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात निवांत अंध मुक्त विकासालय या संस्थेच्या अंध विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या विद्यार्थ्यासाठी रंगाऎवजी चित्रे असलेले खास रुबिक क्यूब डिजाईन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला फोरबिज मार्शल चे नवीले फर्नाडिस तसेच लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड चे व्ही.व्ही. आर. मुर्ती उपस्थित होते. तसेच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या नियमांनुसार परिक्षणासाठी स्टिवर्डस आणि वेटिनेस यांची ही नियुक्ती करण्यात आली होती. गिनीज च्या वतीने या विश्वविक्रमाची आधिकृत घोषणा होणे बाकी असले तरी आय.आय.टी चा रुबिक क्यूब चा विक्रम मोडून नवा विक्रम नोंदवल्याचा समाधान सर्वंच विद्यार्थ्यांमध्ये दिसत होते. या विक्रमा विषयी विदयार्थ्यांमध्ये कमालाची उत्सुकता होती. सेकेंड ईयर मध्ये शिकाणाऱ्या सचिन जाधव या विद्यार्थ्याची ही कल्पना असून गेल्या वर्षभरापासूनच या उपक्रमाची जोरदर तयारी कॉलेज मध्ये सुरु होती. कमी वेळेत हे कोडे सोडवण्यासाठी कॉलेज मध्ये कार्यशाळाही आयोजित केल्या जात होत्या. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक आणि इतर कर्मचारी ही सहभागी झाले होते. या कार्यशाळेच्या निमित्ताने प्रथमच शिक्षक विद्यार्थी आणि विद्यार्थी शिक्षकांच्या भुमिकेत होते आणि यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक मधील अतंर कमी झाले असे मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. या आधीही सीईऒपीयन्स नी दोनदा विश्वाविक्रम केले आहेत.
[nggallery id=116]